Health Tips : हिवाळ्यात <a href="https://ift.tt/P5EbGXZ> लसणाचे <a href="https://ift.tt/ZXLjIuN> सेवन करणं खूप फायदेशीर मानले जाते. लसूणमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे सर्दी आणि फ्लू सारख्या आजारांशी लढण्यास आणि प्रतिबंध करण्यास मदत करतात. हिवाळ्यात दररोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. याशिवाय हृदयाच्या आरोग्यासाठीही ते खूप फायदेशीर आहे. लसूण खाल्ल्याने शरीरातील अँटीऑक्सिडंट्स वाढतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. रक्त पातळ करून रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात. त्यामुळे हिवाळ्यात लसणाची पाकळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. याशिवाय आणखी कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊयात.
सर्दी-खोकल्यामध्ये फायदेशीर :
हिवाळ्यात सर्दी-खोकल्यासारख्या समस्या सामान्य आहेत. बदलत्या हवामानामुळे मुले आणि प्रौढ दोघांनाही संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पण, जर तुम्ही तुमच्या आहारात लसणाचे नियमित सेवन केले तर तुम्ही या समस्या टाळू शकता. लसणात नैसर्गिकरित्या अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे लसणाचे सेवन केल्याने सर्दी, खोकल्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. लसणाची चटणी, भाज्यांमध्ये लसूण घालणे किंवा कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाणे, या सर्वांमुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवून सर्दी-खोकला दूर होण्यास मदत होईल. यासाठी लसणाचं सेवन करा.
थंडीपासून आराम मिळेल :
लसणात उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि थंडी कमी होते. लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे हात आणि पायांना उबदारपणा येतो आणि थंडीपासून आराम मिळतो. त्यामुळे लसणाचा वापर स्वयंपाक करताना किंवा हिवाळ्यात कच्चा लसूण खाल्ल्याने शरीराला थंडीपासून आराम मिळतो. सर्दी टाळण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. 
लसणामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते :
हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. या ऋतूमध्ये व्हायरस आणि बॅक्टेरिया सक्रिय होतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार होतात. अशा वेळी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे खूप महत्त्वाचे आहे. लसणामध्ये अॅलिसिन नावाचे एक संयुग असते ज्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म असतात. हे गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे हिवाळ्यात लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते. 
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/iLnVpv2 Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : हिवाळ्यात लसणाची पाकळी खाणं आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या कसे?https://ift.tt/8w7crq0
NMK marathi jobs Maha NMK Marathi Nokari maha naukari Recruitments details information in Marathi with NMK Mahanews Mahajobs Updates about latest jobs, upcoming Naurki ads and MahaNews Maharashtra Government Jobs Details.
- Sitemap
- Disclaimer
- Privacy