Health Tips : वातावरणात हळूहळू बदल होऊ लागले आहेत. पावसाळा संपून हिवाळा सुरु होणार आहे. अशा हवामानात अनेक आजार वाढतात. अशा वेळी सर्दी, खोकला ही सामान्य समस्या आहे. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे इन्फ्लूएंझा, सायनुसायटिस, टॉन्सिलिटिस यांसारख्या समस्याही या ऋतूत उद्भवतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला हिवाळ्यात आजारी पडायचे नसेल तर आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही उपचार करू शकता. काही उपाय आहेत जे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करून रोगांपासून तुमचे रक्षण करू शकतात चला तर जाणून घेऊयात हे आयुर्वेदिक उपाय नेमके कोणते आहेत.

ध्यान योग

शरीराला तणावमुक्त ठेवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही ध्यान आणि योगाचा समावेश करू शकता. नियमितपणे योगा केल्याने तुम्हाला शारीरिकदृष्ट्या मजबूत मिळते आणि मानसिक तणावही दूर होतो. अशी अनेक योगासने आहेत जी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. रोज प्राणायाम केल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

आयुर्वेदिक प्रक्रिया

इतर काही आयुर्वेदिक प्रक्रिया आहेत ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढू शकते. यापैकी तीळ किंवा खोबरेल तेल किंवा तूप नाकपुडीमध्ये सकाळ संध्याकाळ लावणे फायदेशीर मानले जाते. याशिवाय ऑईल पुलिंग थेरपी देखील खूप प्रभावी मानली जाते. एक चमचा तीळ किंवा खोबरेल तेल तोंडात टाका, दोन ते तीन मिनिटे चघळा आणि थुंकबन टाका. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. ही प्रक्रिया रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही उपयुक्त ठरते.

औषधी वनस्पतींचा वापर

हिवाळ्यात काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत, ज्यांचे रोज सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यात हळदीचे दूध, अश्वगंधा, तुळशी आणि अनेक आयुर्वेदिक औषधांचा समावेश आहे. डेकोक्शनमुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आरोग्य सुधारण्याचे काम करते. सर्दी-खोकल्यात हा रस खूप फायदेशीर आहे. तसेच शरीर निरोगी ठेवण्याचे काम करते.

यासाठी तुम्हाला जर हिवाळ्यात निरोगी राहायचं असेल तसेच तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करायची असेल तर तुम्ही या आयुर्वेदिक उपायांचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तर फरक जाणवेलच पण मानसिकदृष्ट्याही तुम्ही स्ट्रॉंग राहाल. योग तुम्हाला मानसिक तणाव दूर करण्यास फायदेशीर ठरेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/NjDHl0Y Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : बदलत्या ऋतूतही तुम्ही आजारी पडणार नाही;.'हे' आयुर्वेदिक उपाय करून पाहा; प्रतिकारशक्तीही होईल मजबूतhttps://ift.tt/KItbCVG
NMK marathi jobs Maha NMK Marathi Nokari maha naukari Recruitments details information in Marathi with NMK Mahanews Mahajobs Updates about latest jobs, upcoming Naurki ads and MahaNews Maharashtra Government Jobs Details.
- Sitemap
- Disclaimer
- Privacy